PMFBY नोंदणी प्रक्रिया

1. https://pmfby.gov.in/csclogin ला भेट द्या. खालील पेज उघडेल.

2. ” CSC Connect ” वर क्लिक करा खालील screen दिसेल.

  • तुमचा CSC ID आणि पासवर्ड ने लॉगीन करा.

3. राज्य योजना आणि हंगाम वर्ष योग्य ते निवडा.

  • राज्य: महाराष्ट्र
  • योजना – प्रधान मंत्री फसल बीमा योजना
  • हंगाम – खरीप
  • वर्ष – 2024

4. Application वरती क्लिक करा.

5. Application Form वरती क्लिक करा.

6. शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती अचूक भरा.

  • बँक ज्या ठिकाणी असेल त्याचे राज्य आणि जिल्हा निवडा
  • बँकेचे नाव निवडा
  • त्या बँकेच्या शाखेच नाव पासबुक वरती बघून निवडा
  • खात्याचा प्रकार निवडा
  • बँक खात्याचा नंबर अचूक भरा पुष्टी करण्यासाठी परत तोच खाते नंबर टाका
  • किंवा IFSC कोड टाकून सुद्धा करू शकतात परंतु खाते जिल्हा बँकेचे असल्यास वरील पद्धतीनेच करावे.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या Check Bank Details & Continue या बटन वरती क्लिक करावे.

7. शेतकऱ्याचा पत्ता आणि वयक्तिक माहिती अचूक भरा.

  • बँक खाते पुस्तकावरती जे नाव आहे त्या प्रमाणे नाव भरा.
  • आधार कार्ड प्रमाणे नाव भरा.
  • आधार नंबर टाका. आणि Verify बटन वरती क्लिक करा.
  • कोणत्याही एका नातेवाईकाशी असलेले नाते प्रविष्ट करा
  • नातेवाईकाचे नाव प्रविष्ट करा (वडील, पती, मालक इत्यादी)
  • शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, लिंग, जात प्रवर्ग प्रविष्ट करा
  • शेतकरी वर्ग प्रविष्ट करा.
  • Owner: जर आपण जमिनीचे एकमेव मालक असाल.
  • Tenant: भोगवटादार (जर आपण दुसऱ्याच्या जमिनीवर विमा घेत असाल) अनिवार्यरित्या नोंदणीकृत भोगवता करार पत्र अपलोड करा.
  • Sharecropper: सहभागी (जर जमिनीचे एकापेक्षा अधिक मालक असतील) ज्या सर्व शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांच्या सह्यांसहित संमती पत्र अनिवार्यरित्या अपलोड करा. संमती पत्राचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  • Farmer Type निवडा.

त्यानंतर खाली शेतकऱ्याचा योग्य निवासी तपशील द्या. जसे राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिन कोड.

8. Declare Nominee Later या ठिकाणी क्लिक करा आणि खाली Save & Continue या बटन वरती क्लिक करा

9. खालील स्क्रीन दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या जमिनीचा जिल्हा, तालुका, महसूल मंडळ, ग्रामपंचायत आणि गाव प्रविष्ट करा (याकरिता निवासी गावाची माहिती विचारात घेऊ नका)

10. याच्याच ठीक खाली पिकाची आणि क्षेत्राची माहिती भरा.

  • Mix Cropping- मिश्र पिके घेतली आहेत का ? घेतली असेल तरच सिलेक्ट करा
  • Crop- पिकाची निवड करा
  • Sowing Date- पेरणीची तारीख प्रविष्ट करा
  • Survey No- योग्य सर्वे/खाता क्रमांक प्रविष्ट करा
  • Khata No- योग्य खसरा/प्लॉट क्रमांक प्रविष्ट करा

11. योग्य सर्वे/खाता क्रमांक आणि खसरा/प्लॉट क्रमांक प्रविष्ट केल्यावर Verify वर क्लिक करा. स्क्रीनवर जमिनीच्या मालकाचे नाव दिसेल.

  • Verify वर क्लिक करताच, योग्य विमा क्षेत्र प्रविष्ट करा आणि Add crop or Survey Number for Insurance वर क्लिक करा

12. कागदपत्र अपलोड करा.

  • Passbook- पासबुक फोटो- स्पष्ट आणि योग्य बँक पासबुक फोटो अपलोड करा.
  • Land Record- आपले जमीन दस्तावेज अपलोड करा स्पष्ट आणि योग्य सातबारा.
  • Sowing Certificate- पेरणी प्रमाणपत्र- स्पष्ट आणि योग्य पेरणी प्रमाणपत्र अपलोड करा.
  • Tenant Certificate- जर आपण भोगवाटादार म्हणून नोंदणी करत असाल तर दुय्यम निबंधक यांनी जारी केलेले नोंदणीकृत भोगवाटा करार पत्र अपलोड करा.
  • जर आपण सहभागी म्हणून नोंदणी करत असाल तर च्या सर्व शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांच्या सह्यांसहित सहमती पत्र अपलोड करा.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply to GAJanan Patil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *