कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) अंतर्गत प्रधान मंत्री फसल बीमा योजना (PMFBY) 2025-26

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सरकारी सेवांमध्ये प्रवेश सुलभ करणे आहे. PMFBY ही योजना शेतकऱ्यांना पीक विमा देऊन त्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई प्रदान करते. CSC च्या माध्यमातून PMFBY साठी अर्ज करणे सोपे झाले आहे.

  

महत्वाच्या लिंक:

PMFBY CSC Login Linkhttps://pmfby.gov.in/csclogin
पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्रDownload Format
सामाईक क्षेत्र सहमती पत्र Download Format
Crop Ratio CalculatorDownload Exel file
Wrong Applicaion RejectionClick to Submit
अर्ज Reject करीता स्वयंघोषणापत्रDownload Format
नोंदणी प्रक्रिया VLE करीताClick to See
विमा कंपनी प्रतीनिधी यादी जिल्हा जळगावClick to See
PMFBY NotificationDownload
=

CSC केंद्र चालकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना:

  1. अर्ज भरताना शेतकरी यांच्या कडुन 1 रु प्रति अर्ज याशिवाय दुसरे कुठलेही शुल्क आकारायचे नाही, असे आढळल्यास किंवा शासना कडूण तक्रार प्राप्त झाल्यास आपला CSC ID बंद केला जाईल याची नोंद घ्यावी.
  2. VLE यांना प्रति अर्ज 32 रुपये प्रमाणे CSC कडून पैसे मिळणार आहेत हे पैसे आपल्या CSC Wallet मध्ये जमा होतील याची नोंद घ्यावी.
  3. जर शेती भाडे तत्वावर करायला घेतली असेल तर Register Tenant Agreement असणे गरजेचे आहे. Stamp Paper वरती करारनामा चालणार नाही.
  4. जर एखाद्या देवस्थान किंवा Trust च्या नावे अर्ज करत असाल तर पुर्णपणे कागद पत्रे असल्याशिवाय अर्ज भरु नये (रजिस्टर अग्रीमेंट) असणे गरजेचे आहे अन्यथा संबधित VLE यांच्यावर पोलिस कारवाई होऊ शकते.
  5. आपला CSC ID हा आपल्या जिल्हापुरता मर्यादित ठेवावा त्यावरून जिल्हाबाह्य अर्ज भरल्याचे आढळल्यास सदरील CSC ID बंद केला जाईल.
  6. संमती पत्र जोडताना जो अर्ज दिला आहे त्याच अर्जावरती संमतीपत्र घ्यावे त्यासाठी स्टॅप पेपर ची आवश्यकता नाही शेतकरी यांना खर्चात पाडु नये.
  7. शेतकऱ्यांचे 10 पेक्षा जास्त अर्ज आपल्याकडे जमा करून ठेवू नये.
  8. कोणतेही अर्ज Unpaid Application मध्ये ठेवू नका, फॉर्म भरल्यानंतर लगेच त्याचे पेमेंट करा. Unpaid Application मध्ये असलेले अर्ज हे 24 तासांमध्ये डिलीट होतात.
  9. पिक विमा भरत असताना शेतकऱ्याकडून मिळणारी माहिती आपण क्रॉस चेक करूनच फॉर्म मध्ये भरावी चुकी झाल्यास ती सुधारण्याची शक्यता कमी असते अशा वेळेस ते अर्ज Revert अथवा Reject सुद्धा होऊ शकतात.
  10. ज्या शेतकऱ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी (*DCC) बँकेचे असतील अशा शेतकऱ्यांचा अर्ज करताना IFSC कोड न टाकता शाखेचे नाव (Branch Name) सिलेक्ट करावे अन्यथा पावती वरती चुकीची शाखा दिसू शकते.
  11. कंपनी कडून Revert आलेले अर्ज 7 दिवसाच्या आत परत सबमिट करावे.
  12. पिक विमा भरत असताना शेतकऱ्याकडून मिळणारी माहिती आपण क्रॉस चेक करूनच फॉर्म मध्ये भरावी चुकी झाल्यास ती सुधारण्याची शक्यता कमी असते अशा वेळेस ते अर्ज Revert अथवा Reject सुद्धा होऊ शकतात.
  13. शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, पत्ता पुरावा, 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे पूर्णपणे तपासा आणि योग्यतेने अपलोड करा.
  14. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा भरून घेण्यासाठी आग्रह करा, शेवटच्या वेळेला पोर्टलला अडचणी निर्माण होऊ शकतात याबद्दल त्यांना समजावून सांगा.
  15. पिकांची नोंदणी करताना, पिकांचे प्रकार, क्षेत्रफळ, आणि अपेक्षित उत्पादन यांची माहिती नीट तपासा.
  16. CSC केंद्र चालकांनी नियमितपणे प्रशिक्षण घ्यावे, प्रशिक्षणाद्वारे नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रियेबद्दल माहिती मिळवा.

नोंदणी प्रक्रिया:

  • CSC केंद्र शोधा:
    o जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये भेट द्या.
    o CSC केंद्राची माहिती CSC अधिकृत वेबसाइट वरून मिळवा.
  • कागदपत्रांची तयारी करा:
    o आधार कार्ड
    o बँक पासबुक
    o 7/12 उतारा
    o पिक नोंदणी दस्तावेज (पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र)
  • CSC केंद्रात नोंदणी:
    o CSC केंद्रात आवश्यक कागदपत्रे आणि फोटो सोबत घेऊन जा.
    o CSC ऑपरेटरला PMFBY अंतर्गत नोंदणी करायची आहे असे सांगा.
  • पिकांची माहिती भरा:
    o पिकांचे प्रकार, क्षेत्रफळ, आणि अपेक्षित उत्पादन यांची माहिती CSC ऑपरेटरला द्या.
    o ऑपरेटर नोंदणी फॉर्म भरतील आणि आवश्यक ती माहिती पोर्टलवर अपलोड करतील.
  • प्रीमियम भरणे:
    o विमा हप्त्यांची गणना करून CSC केंद्रावर प्रीमियम भरा.
    o PMFBY २०२४-२५ योजनेसाठी प्रीमियम फक्त १ रुपया आहे, प्रीमियम भरण्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल.
  • नोंदणी पुष्टीकरण:
    o नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक किंवा सर्टिफिकेट दिले जाईल.
    o पावती मिळाल्यानंतर पावती वरील माहिती योग्य आहे का हे तपासून पाहवे. सर्टिफिकेट तुमच्या विमा संरक्षणाची पुष्टी करते.
  • पिक विमा शेतकरी तक्रार निवारण टोल फी क्रमांक 14447.

महत्त्वपूर्ण टीप:

• PMFBY अंतर्गत नोंदणीसाठी शेवटची तारीख चुकवू नका दिनांक ३१ जुलै २०२४.
• योग्य माहिती भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.